शिंदे शिवसेनेचे बाबू कुडतकर यांच्या मागणीला यश…
सावंतवाडी : आठवडा बाजार स्थलांतरित केलेल्या गोदामाच्या चारी बाजूला पावसापूर्वी डांबरीकरण करून देण्यात याव अशी मागणी माजी नगरसेवक बाबु कुडतरकर यांनी केली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आठवडा बाजारासाठी पायाभूत सुविधांसाठी पावसाळ्यात निर्माण होणारी गैरसोय लक्षात घेऊन तब्बल ५० लाख रूपयांची निधी दिल्याने माजी नगरसेवक व शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांनी आमदार दिकप केसरकर यांचे आभार मानले आहेत.
