⚡बांदा ता.२९-: क्रिकेट खेळताना चक्कर येऊन पडल्याने मडूरेत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सचिन दिगंबर गावडे (४४, रा. मडुरा भरडवाडी) असे त्यांचे नाव आहे. ते नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास असून काही दिवसांपूर्वीच ते कुटुंबियां समवेत सुट्टीत मडुरा गावी आले होते. रविवारी सायंकाळी ते घरातील लहान मुलांसोबत साई मंदिर परिसरात गेले होते. क्रिकेट खेळत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्याच ठिकाणी ते खाली कोसळले.
माजी ग्रा. पं. सदस्य सखाराम परब यांनी त्यांना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र त्यांचा तत्पूर्वीच मृत्यू झाला. त्यांच्या अकाली जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
