आनंद नेवगी; मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना दिले निवेदन…
⚡सावंतवाडी ता.२९-: आपला दवाखाना उभा बाजार रघुनाथ मार्केट येथील बंद असलेल्या मटन मार्केट इमारतीमध्ये सुरू करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
या निवेदनात असे नमूद करण्यात आले की जिमखाना मैदान लाके वस्ती शेजारी सुरू करण्यात येणारे आपला दवाखान्याला तेथील रहिवाशांनी विरोध केला आहे त्यामुळे लाकेवस्तीत सुरू होणार आपला दवाखाना हा उभा माझा रघुनाथ मार्केट इथे बंद असलेल्या मटन मार्केटमध्ये सुरू करावी अशी विनंती त्यांनी यावेळी केली आहे.
