सावंतवाडीतील “फ्रेश मार्ट” सुपर मार्केट उद्यापासून ग्राहकांच्या सेवेत…

एकदा अवश्य भेट द्या ; पटेकर बंधूंचे आवाहन

⚡सावंतवाडी,ता.२४-: शहरातील जुना बाजार येथील कलावती आई मंदिराच्या समोर असलेल्या गणेश प्लाझा या इमारतीत “फ्रेश मार्ट” या नावाने सुपर मार्केटचे दालन ग्राहकांसाठी उद्यापासून सुरु होत आहे. बाजारभाव आणि ऑनलाईपेक्षा कमी किंमतीत येथे सर्व वस्तू उपलब्ध करुन देण्यात येणार आहे या शुभारंभ कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहावे असे, आवाहन फ्रेश स्मार्टचे संचालक महेंद्र पटेकर व दीपक पटेकर यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

या फ्रेश मार्ट मध्ये रोजच्या घरगुती वापराच्या वस्तू यामध्ये खाद्यपदार्थ, कडधान्य यासह चादर, चप्पल, बेडशीट, कपडे यासारख्या अनेक वस्तू माफक दरात उपलब्ध होणार आहे.सध्या मार्केटमध्ये ऑनलाईन खरेदीचे फॅड असतांना ग्राहकांना ऑनलाईनपेक्षा स्वस्तात वस्तू येथे उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
त्यामुळे जास्तीत-जास्त ग्राहकांनी या मार्टला एकदा अवश्य भेट द्यावी असे, आवाहन पटेकर बंधूंच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page