राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

भाजप विरोधी नेत्यांनाअडकवण्याचा करतेय प्रयत्न;जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा आरोप

⚡ओरोस ता.२२-: विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून ईडी, सीबीआय या सारख्या यंत्रणांच्या गैरवापर केला जात आहे. अनेक नेत्यांना त्यामध्ये नाहक अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यांच्या निषेधार्थ सम्पूर्ण राज्यात जिल्हाधिकारी याना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदने देण्यात आली. त्याप्रमाणे सिंधुदुर्गात सुद्धा निवेदन देण्यात आले, अशी माहिती आज सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.


निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी राज्य पदाधिकारी काका कुडाळकर, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कन्याळकर , दर्शना देसाई ,समीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, संजीव लिंगावत, योगेश कुबल, निलेश गोवेरीकर, उमेश यादव, नजीर शेख, देवेंद्र पिळणकर, चंद्रकांत नाईक, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page