गावची अस्मिता “शाळा” वाचवणे माजी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची ही जबाबदारी…

दयानंद कुबल; डोंगरपाल माऊली विद्यामंदिर माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न..

बांदा/प्रतिनिधी
सुसंस्कृत समाज घडविण्याचे काम हे ज्ञानमंदिर करत असते. गावाची अस्मिता असलेली शाळा वाचविणे ही माजी विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामस्थांचीही तेवढीच जबाबदारी आहे. डोंगरपाल माऊली विद्यामंदिर नव्याने उभारण्यासाठी माजी विद्यार्थी म्हणून आपले निश्चितच सहकार्य असेल व त्यादृष्टीने काम देखील सुरु असल्याचे आश्वासन माजी विद्यार्थी तथा कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी डोंगरपाल येथे दिले.


डोंगरपाल येथील श्री माऊली विद्यामंदिर येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री कुबल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे पदाधिकारी विलास सावंत, देविदास नाडकर्णी, प्रमोद कामत, नारायण सावंत गुणाजी गवस, रामदास नाईक तर माजी विद्यार्थी संघटनेकडून दयानंद कुबल, जयेश सावंत, निकिता कुबल, अमित गवस, रुपेश गवस, गोविंदराज गवस आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री कुबल यांनी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने हायस्कूल वाचवण्यासाठी काय करावे लागेल याबाबत मार्गदर्शन केले. विद्यालयाची पटसंख्या वाढवण्यासाठी वसतिगृह निर्मिती, विद्यार्थ्यांसाठी वाहन सुविधा उपलब्ध करणे, अतिरिक्त इंग्रजी शिक्षक उपलब्ध करून देणे, जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थी संख्या आणि पंचक्रोशीतील शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, वेगवेगळे उपक्रम करणे, संस्थेचे सभासदत्व घेऊन कामात मदत करणे याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी सखोल चर्चा होऊन वसतिगृह आणि वाहन सुविधा उपलब्ध करण्यापासून कामाची लवकरात लवकर सुरुवात करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. यावेळी प्रमोद कामत, नारायण सावंत यांनी देखील मार्गदर्शन केले.
यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ऋग्वेदिता देसाई, कृष्णा राणे, बाळकृष्ण राणे, घनश्याम गवस, बाळकृष्ण गवस, श्री कदम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वावळीये यांनी केले. प्रास्ताविक अरुण देसाई यांनी केले. आभार विलास सावंत यांनी मानले.

You cannot copy content of this page