चिंदर सडेवाडी ब्राम्हणदेव मंदिर येथे ११ रोजी विविध कार्यक्रम

मालवण ता.०६-: चिंदर-सडेवाडी (हडकरवाडी) येथील ब्राह्मणदेव मंदिर येथे दि. ११ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. आरती, तीर्थप्रसाद, दु. १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ७ वा. भजन, दिंडी नृत्य (आचरा), रात्रौ १० वा. चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळाचा ‘शिवशक्ती वेताळ’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

तरी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ब्राह्मणदेव सेवा मंडळ, चिंदर सडेवाडी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page