देव नाही देव्हाऱ्यात नाटक होणार सादर
मालवण ता.०६-: मालवण तालुक्यातील हडी येथील जि. प. प्राथमिक शाळा हडी नं. २ जठारवाडा शतकमहोत्सव सोहळ्यानिमित्त मंगळवार दिनांक ९ मे २०२३ रोजी रात्री १० वाजता दोन अंकी प्रा. मो. दा. देशमुख लिखित आणि संतोष सावंत दिग्दर्शित नाटक “देव नाही देव्हाऱ्यात” सादर केले.
जाणार आहे यात कलाकार म्हणून उमेश हडकर, संतोष सावंत, रुपेश आमरे, नागेश कावले, गौरव कावले, आदित्य धुरी, योगिता सावंत, कु. साक्षी लाड तसेच बालकलाकार पूर्वा कावले पाहुणे कलाकार अर्जुन मालवणकर, निरज पेडणेकर आणि चौरंगी भूमिकत महेश लाड यांचा सहभाग आहे या नाट्यप्रयोगाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे
