मुक्या प्राण्यांप्रति दाखविली भूतदया
देवगड ता.०५-: देवगड जामसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक विशाल मांजरेकर घंटा गाडी घेऊन कचरा संकलन केल्यानंतर देवगड जामसंडे वासियाच्या कौतुकास पात्र ठरल्यानंतर चर्चेत आले त्यानंतर पुन्हा एकदा मुक्या जनावराला मोकाट सोडलेल्या गुरावर उपचार करून त्याची काळजी घेत पुन्हा एकदा मुक्या प्राण्यांचे मित्र म्हणून चर्चेत आले आहेत.
८ दिवसा पूर्वी २ दिवस मराठे हॉस्पिटल चा मागील कातळावर जखमी अवस्थेत एक पाडा पडला होता.
तिथल्या स्थानिकांच्या मदतीने टेम्पोत घालून पशू वैद्यकीय दवाखान्यामध्ये आणून त्यावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ माधव घोगरे मार्फत नगरसेवक विशाल मांजरेकर यांनी उपचार केले .
परंतु त्यात सुधारणा झाली नाही आणि बुधवारी पुन्हा नजीकच्या खड्ड्यात तो पाडा पडला तेथून बाहेर काढून श्री मांजरेकर यांनी स्वतःच्या टेम्पो मधून सहकारी मित्र कणेरकर ,गणेश, हरी आणि हॉस्पिटल स्टाफ यांच्या मदतीने गावठी उपचारासाठी गोठ्यात आणला आहे.मुक्या जनावरांची सेवा नगरसेवकांनी केली परंतु अद्याप पर्यंत कोणीही मालक संपर्क साधू शकला नसल्याने
मालकाने संपर्क साधून ओळख पटवुन घेऊन जावा.एरवी मोकाट गुरांबाबत. नगरपंचायतीच्या नावाने ओरड मारणारे नागरिक मालकही जागरूकता दाखवत नाही अथवा उपचारकरिताही पुढे येत हे दुर्दैव आहे.
