संत गाडगेबाबा भाजी मंडई साठी 100 कोटीचा निधी द्या…

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी

⚡सावंतवाडी ता.०५-: शहरातील नव्याने उभारण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा भाजी मंडई साठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्या असे मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली श्री साळगावकर यांनी आज त्यांची केसरी येथील निवासस्थानी भेट घेतली.

मंत्री चव्हाण यांना साळगावकर यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले की संत गाडगेबाबा शॉपिंग कॉम्प्लेक्स प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित असून या शॉपिंग मार्केटकडे सतत दुर्लक्ष करण्यात आलेला आहे आपण या सुपर मार्केट कॉम्प्लेक्स साठी खास बाब म्हणून 100 कोटी रुपये उपलब्ध करून द्या. शहरातील व्यापाऱ्यामध्ये या मार्केट बाबत संभ्रम आहे यासाठी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यांचा तात्पुरत्या पुनर्वसनाबाबत त्यांना विश्वासात घेऊन विश्वास द्यावा लागेल त्यासाठी आपण मार्गदर्शन करावे व्यापाऱ्यांना योग्य असा आराखडा मंजूर करावा अशी मागणी केली आहे.

You cannot copy content of this page