▪️मनीष दळवी;एम्. अकॅडमीच्या नवीन “जर्सी चे” दळवी यांच्या हस्ते नावरण…*
⚡सावंतवाडी ता.०५-: एम् अकॅडमी घडवण्यासाठी तयार केलेला इंडोर अकॅडमी व मुलांना क्रिकेट खेळाबाबत देत असलेल्या सुविधा बाबत ॲकॅडमीचे अध्यक्ष उदय नाईक यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचं गौरद्वार जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले. एम् क्रिकेट ॲकॅडमीच्या नवीन जर्सीचे काल श्री दळवी यांच्या हस्ते अनावरण झाले. या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
दरम्यान या एम्. अकॅडमीच्या माध्यमातून चांगले खेळाडू घडवून देशासाठी खेळतील अशी इच्छा यावेळी दळवी यांनी बोलताना व्यक्त केली.
या प्रसंगी अॅकडमीचे अध्यक्ष उदय नाईक, अॅकडमीचे सदस्य प्रसाद सावंत, अॅकडमीचे प्रशिक्षक राहुल रंगे, अविनाश जाधव सर्व पालक वर्ग व खेळाडू उपस्थित होतो.
