अवैद्य धंदे व भोंग्याबाबत मनसेने वेधले लक्ष…

पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा; कारवाईची मागणी

सावंतवाडी ता.०५-: प्रार्थना स्थळांवरील भोंगे व अवैद्य धंद्याबाबत आज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके यांची भेट घेत चर्चा केली.
सावंतवाडी तालुक्यातील चालू असलेल्या अवैद्य धंद्यांमुळे युवा पिढी व्यसनांच्या आड जाऊन बरबाद होत आहे याला आळा बसावा अशी मागणी केली.
यावेळी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांचा आवाज तपासण्यात येईल व क्षमतेपेक्षाही मोठ्या प्रमाणात भोंग्यांचा आवाज आढळल्यास कारवाई करण्यात येईल तर अवैद्य धंद्यांबाबतही आपण योग्य कारवाई करणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना शब्द दिला. यावेळी मा शहराध्यक्ष तथा विद्यार्थीसेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार माजी उपजिल्हाध्यक्ष अनिल केसरकर परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर संतोष भैरवकर सतीश आकेरकर विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष निलेश देसाई प्रमोद तावडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page