सिधुदुर्ग रेखाचित्र संघटनेच्या अध्यक्षपदी राजू तावडे यांची बिनविरोध निवड…

सचिवपदी प्रसाद कापडोसक यांची वर्णी…

⚡सावंतवाडी ता.०२-: महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा संघटना महाराष्ट्र शाखा सिंधुदुर्ग च्या अध्यक्षपदी श्री. राजू तावडे तर सचिवपदी प्रसाद कापडोसकर यांची पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली.

कुडाळ येथे नुकत्याच पार पडलेल्या संघटनेच्या वार्षिक सभेत ही निवड करण्यात आली.संघटनेचे दिवंगत सभासद भरत जाधव व इतर दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहून सभेची सुरुवात करण्यात आली. सचिव श्री.कापडोसकर यांनी मागील इतिवृत्त व जमा खर्च सर्वांना वाचून दाखवला. अध्यक्ष श्री तावडे यांनी आपल्या भाषणामध्ये संघटनेच्या चालू कार्याबद्दल आढावा घेतला. यावेळी चित्रशाखेतील ज्या सभासदांना पदोन्नती मिळाली त्यांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन संघटनेच्यावतीने गौरव करण्यात आला. यामध्ये मकरंद देसाई, अरुण कुमार साळुंखे, वासुदेव सडवेलकर, प्रसाद कापडोसकर यांचा सत्कार अध्यक्ष व जेष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आला.


संघटनेची जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे गठीत करण्यात आली. उपाध्यक्ष रामू वडर, कोषाध्यक्ष मकरंद देसाई व कार्यकारणी सदस्य भालचंद्र गोसावी, घनश्याम सावंत, अरुणकुमार साळुंखे, सुहास कदम व श्रीमती स्नेहल बुवा. यावेळी वासुदेव साडवेलकर व सुहास कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री.कापडोसकर यांनी सर्वांचे आभार मानले.

You cannot copy content of this page