विविध प्रकल्प आणण्याचे मंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही
आंबोली ता.३०-:आंबोलीतील पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य जगासमोर येण्यासाठी विविध प्रकल्प आंबोलीत उभारण्यात येतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी दिली केसरकर यांनी आंबोलीतील धबधबे कसे विकसित करता येतील याची पाहणी रविवारी केली आंबोलीत जुलै ऑगस्ट महिन्यात देशात सर्वाधिक पाऊस पडतो आंबोली येथील धबधबे खास आकर्षण असते हे धबधबे विकसित करण्यात येतील तसेच फुलपाखरू उद्यान एडवेंचर स्पोर्ट ट्रेकिंग आधी प्रकल्प विकसित करण्यात येतील जेणेकरून येथील पर्यटन प्रकल्पांचे आकर्षण पर्यटकांमध्ये वाढवून आंबोलीतील निसर्ग सौंदर्य जगासमोर येईल असे केसरकर म्हणाले
