लोक अदालतीमधून ३ लाखांची रक्कम वसुल

⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला दिवाणी न्यायालयात पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तालुक्यातील दिवाणीकडील ८, फौजदारी २२ तर ग्रामपंचायत पाणीपट्टी, घरपट्टी, विविध बँका व दूरसंचार निगमकडील एकूण ५३ वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. यावेळी दिवाणी, फौजदारी व वादपूर्व प्रकरणांतील मिळून ३ लाख २४ हजार २६८ एवढी रक्कम वसुल करण्यात आली.


तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला व तालुका बार संघटना वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालयात घेतलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश के.के.पाटील, सहदिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरीकर,अॅड.एस.जी.ठाकूर यांच्या हस्ते झाले.

या लोकअदालतीमध्ये न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक एस.एस.कांबळे, एस.एच.खेडेकर, वकिल, पक्षकार व न्यायालयीन कर्मचारी यांनी सहभाग घेतला. पॅनेल सदस्य म्हणून अॅड.एस.जी.ठाकूर यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page