अवजड वाहतूक प्रकरणी १६ ट्रक चालकांना ५ लाख ३६ हजार रुपयांचा दंड ठोठावला…

आरटीओ विजयकुमार अल्लमवार यांची कारवाई…

⚡आंबोली, ता. २१-: घाटातील अवजड वाहतूक प्रकरणी १८ अवजड ट्रक पकडले होते त्यातील २ गाड्या रिकाम्या मिळाल्या १६ गाड्यांवर ५ लाख ३६ हजार रुपये दंडात्मक कारवाई आर टी ओ विजयकुमार अल्लामवार यांनी केली.मात्र महसूल विभाग तहसीलदार यांनी किती दंड ठोठावला याची माहिती अजून मिळाली नाही अशी माहिती आंबोली पोलीस हवालदार दत्ता देसाई यांनी दिली.

आंबोली येथे अवजड वाहतूक प्रकरणी काल महसूल विभाग आणि आरटीओ आणि पोलिसांनी कारवाई केली. यावेळी सर्कल श्री.गुरव,तलाठी उपस्थित होते. महसूल विभाग यांनी ५ गाड्यांवर कारवाई होणार नसल्याचे तहसीलदार यांनी स्पष्ट केले.अजून किती दंड केला आहे याचे स्पष्टीकरन मिळालेले नाही.तर जिल्ह्याचे आरटीओ विजयकुमार अल्लमवार ,सहाय्यक निरीक्षक अमित पाटील यांनी १८ गाड्यांवर कारवाई केली.त्यापैकी १६ गाड्यांवर ५लाख ३६ हजार चा दंड केला आहे.या ठिकाणी सहाय्यक निरीक्षक तौसिफ सैय्यद,प्रफुल मातोंडकर सहाय्यक उपनिरीक्षक,हवालदार दत्ता देसाई,अभिजित कांबळे,दीपक शिंदे यांनी थांबवून संबंधित खात्याकडे कारवाई करण्यासाठी दिली.

You cannot copy content of this page