एसटी डेपो परिसरातील डांबरीकरणाचे काम निष्कृष्ट दर्जाचे…

शब्बीर मणियार यांचा आरोप ; काम दर्जेदार करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर अधिकाऱ्यांना दम..

⚡सावंतवाडी ता.२१-: येथील एसटी डेपो परिसरातील डांबरीकरणाचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाल्यास शिवसेना गप्प बसणार नाही असा इशारा ठाकरे गटाचे उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार यांनी आज येथे दिला.

दरम्यान सदरचे दर्जेदार काम पावसाळापूर्वी करा असे त्यांनी आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांना खडेबोल सुनावले. श्री मनियार यांना आज एसटी स्टँड परिसरातील रस्त्याचे काम हे निष्कृष्ट पद्धतीने सुरू असल्याचं समजलं त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केला असता सदरचं काम हे बोगस पद्धतीने सुरू असल्याच निर्देशनास आल्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांनी आगार व्यवस्थापक यांना खडे बोल सुनावले आहे.

You cannot copy content of this page