कार्यकारी अभियंत्या अनामिका चव्हाण यांची तत्परता; माती टाकून अपघाताचे प्रकार टाळले..
⚡सावंतवाडी ता.२०-: मळगाव घाटीत धबधब्यासमोर ऑइल सांडल्याने अपघाताचे प्रकार घडले. हा प्रकार सायंकाळी सात वाजता घडला. दरम्यान घटनेची माहीती पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंत्या अनामिका चव्हाण यांना देताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी कर्मचारी पाठवत माती मारुन घेत अपघाताचे प्रकार टाकले.
