वैभववाडी पोलीस ठाण्यातील प्रकार;खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ४० हजारांची केली होती मागणी
वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदाराच्या विरोधात 376 कलमान अंतर्गत गुन्हा दाखल करतो असे सांगून गुन्हा दाखल न करण्याकरिता चाळीस हजाराची लाज मागल्या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुरज शिवाजी पाटील व पोलीस नाईक मारुती संतराम साखरे हे दोघे वीस हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपतपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले.
तीस हजार रुपयाची तडजोड होऊन त्यातील पहिले 20 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात सापडल्याने सिंधुदुर्ग पोलीस खात्यात खळबळ उडाली. गुरुवारी ही कारवाई होऊन या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
वैभववाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरज शिवाजी पाटील यांच्या समक्ष याच पोलीस ठाण्याच्या पोलीस नाईक मारुती संतराम साखरे याने ही वीस हजार रुपयाची लाच तक्रारदाराकडून स्वीकारताना लात लुचपत प्रतिबंधक विभागानचे जाळ्यात रंगेहात पकडले गेले. या पोलिस ठाण्याच्या कक्षेतील भादवि 376 च्या एका गुन्ह्यात अडकवू अन्यथा चाळीस हजार रुपये द्या अशी मागणी या दोघा पोलिसांनी केली होती. या तीस हजार रुपयाची तडजोड झाली होती. त्यातील 20000 रुपये स्वीकारत असताना अँटी करप्शन च्या पथकाने या दोघांना रंगेहात पकडले.
अँटी करप्शन विभागाच्या ठाणा परिक्षेत्राचे अधीक्षक सुनील लोखंडे व उपाधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग चे उपअधीक्षक दीपक कांबळे यांनीही कारवाई केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक भार्गव फाले, पोलीस हवालदार अजित खंडे, कांचन प्रभू, श्री रेवडेकर, श्री परब, श्री पालकर व श्री पेडणेकर या अँटी करप्शन पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होते.
