रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने रुबाबदार मंत्री मिळाला…

निलेश राणे; भविष्यात जनतेसाठी काम करुया..

⚡सावंतवाडी ता.१९-: महा विजय अभियान राज्यात प्रथमच सावंतवाडी मतदार संघात यशस्वी झाले आहे. जिल्ह्याला रुबाबाची सवय केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी लावली होती. २०१४ नंतर त्यात बदल झाला. ठाकरे सरकारच्या काळात निधी कुठे गेला ? हे समजले नाही. रवींद्र चव्हाण पालकमंत्री झाल्याने माझ्यात डबल इंजिन आले. मागील ९ वर्षात एवढा निधी मिळाला नाही. तेवढा निधी मंत्री चव्हाण यांनी जिल्ह्यात आणला आहे.

चव्हाण यांच्या रूपाने जिल्ह्याला राज्याच्या मंत्रिमंडळात वजनदार, रुबाबदार माणूस मिळाला आहे. कोणाच्या नशिबात आमदारकी, खासदारकी आहे ? हे पक्ष नेतृत्व ठरवेल. आपण काम करीत राहूया, असे आवाहन महाविजय यात्रा समारोप प्रसंगी बोलताना भाजप प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांनी केले.

You cannot copy content of this page