भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली;मंत्री केसरकर यांच्यावर साधला निशाणा
⚡सावंतवाडी ता.१९-: महाविजय अभियानाला मोठा प्रतिसाद लाभला. नारायण राणे यांनी पालकमंत्री असताना विकासाचा वेग वाढविला. मात्र, मागील साडेचार वर्षात हा वेग कमी झाला. परंतु, तुम्ही पालकमंत्री झाल्यावर साडे चारशे कोटी रुपये दिलात. घोटगे सोनावडे घाट रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतला. सहयोगी मित्रांनी हवाई पाहणी केली. चष्म्याचा कारखाना कुठे गेला ? दिलेली आश्वासने कुठे गेली. आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी लागेल, असा आरोप शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात केली.
दरम्यान केसरकर यांनी भाजपला नेहमी हिणवले आहे. भविष्यातील सर्व निवडणुका शत प्रतिशत करण्यासाठी तुम्ही साथ द्या. युती करायची असल्यास निवडणुका नंतर करूया. त्यापूर्वी युती नको, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली.
यावेळी त्यांनी आडाळी एम आय डी सी लवकर सुरू करा. उषा इसपात, उत्तम स्टील हे बंद पडलेले उद्योग सुरू झाले पाहिजेत. अन्यथा त्यांना दिलेली जागा काढून घेतली पाहिजे, असेही आवाहन केले.
