जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्र्यांकडून दीड हजार कोटीचा निधी

भाजप प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब : महा विजय यात्रा समारोप

⚡सावंतवाडी ता.१९-: महाविजय यात्रेमध्ये केंद्र व राज्य शासनाने काय केले हे जनतेला सांगता आले. नगराध्यक्ष असताना व राज्यात सत्ता नसताना ४७ कोटी रुपये पाण्यासाठी दिले. गेल्या महिन्यात नगरपालिकेला सात कोटी रुपये दिले आहेत. याबाबत सावंतवाडी नागरिकांकडून मी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार व्यक्त करतो. निलेश राणे नेहमीच येथील कार्यकर्त्यांना मदत करतात. जिल्ह्यासाठी विविध माध्यमातून पालकमंत्री दीड हजार कोटी रुपये दिले आहेत.

यापुढे पालकमंत्री चव्हाण यांनी सावंतवाडी मतदार संघासाठी काम करावे, असे आवाहन महा विजय यात्रा समारोप प्रसंगी बोलताना भाजप प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी बोलताना केले.

You cannot copy content of this page