वेंगुर्लेत १३ मे रोजी विवाहित दांम्पत्यांसाठी खुल्या ‘युनिक कपल २०२३’ स्पर्धेचे आयोजन

⚡वेंगुर्ले ता.१८-: वेंगुर्ले तालुका गौड सारस्वत समाजातर्फे दि १३ मे २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता वेंगुर्ले मटवाडी येथील सिध्दी विनायक मंगल कार्यालयात विवाहित दाम्पत्यासाठी युनिक कपल २०२३” या नावाची खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
या स्पर्धेत विवाहितच दाम्पत्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना वयाचे बंधन नाही. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यास रोख रु १५ हजार व मुकूट व्दीतीय क्रमांक विजेत्यास रोख रू ११ हजार व सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांक विजेत्यास रोख रू. ८ हजार व सन्मानचिन्ह अशी पारीतोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच कॅटवॉक बेस्ट कोऑर्डनिशन व बेस्ट आऊटफिट यांना रोख रकमेची बक्षिसे आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत.
सदर स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी सुजाता पडवळ- ९४२१२२८२३९ किंवा संजय पुनाळेकर- ९४२२४३४८७४ यांचेशी संपर्क साधावा। किंवा सारस्वत बँक शाखा, वेंगुर्ले समोरच्या आरोग्यम फार्मा शाँपी येथे नावे नोंदवावीत असे आवाहन गौड सारस्वत समाज, वेंगुर्ले यांचेतर्फे करण्यात आले आहे

You cannot copy content of this page