मारहाण प्रकरणी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा…

कारिवडे येथील घटना; जमिनीतून गाडी नेल्याचे कारण

⚡सावंतवाडी ता.१७-: घराशेजारील जमिनीतून चार चाकी गाडी नेल्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून विलास लक्ष्मण पोकळे व विनोद विलास पोकळे रा. कारिवडे या पिता पुत्राकडून आपल्याला मारहाण केल्याप्रकरणी पांडुरंग बाबुराव कारिवडेकर वय 33 रा.कारिवडे गावठाणवाडी यांनी येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी सायंकाळी उशिरा घडला.

याबाबत अधिक माहिती असे की यातील तक्रारदार पांडुरंग कारिवडेकर यांच्या घराशेजारील जमिनीतून विनोद विलास पोकळे हा आपली चार चाकी गाडी घेऊन गेला याबाबत तक्रारदार यांच्या आईने विनोद याचे वडील विलास पोकळे यांना विचारणा केली याचा राग आल्याने त्याने हातातील साखळीने तक्रारदार याला मारहाण केली तसेच विनोद त्याने डोक्यात दगड मारुन दुखापत केली. घडलेल्या प्रकारानंतर पांडुरंग कारिवडेकर याने पोलीस ठाण्यात धाव घेऊन पिता पुत्राविरुद्ध पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली त्यानुसार पिता पुत्र दोघांवर मारहाणीचा गन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page