Headlines

पराड दुर्गादिवी मंदिर वर्धापन दिन २५ रोजी

⚡मालवण ता.१७-: पराड येथील दुर्गादिवी मंदिराचा २१ वा वर्धापन दिन व सत्यनारायण महापूजेनिमित्त दि. २५ एप्रिल रोजी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. यानिमित्त कुलदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवतांना निमंत्रित करून गणपती पूजन आदी धार्मिक कार्यक्रम वेदमूर्ती नंदन परांजपे (गोवा). यांच्या पौरोहित्याखाली होणार आहेत. सकाळी ७.३० ते दुपारी २ वा. यज्ञमहोत्सव, दुपारी २ ते सायंकाळी ४ वा. महाप्रसाद, सायंकाळी ६ वा. सत्यनारायण महापूजा, रात्री ८ वा. भजने, ९ वा. जय हनुमान दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन सुभाष पराडकर (बाबा गावकर) यांनी केले आहे.

You cannot copy content of this page