कुंभारमाठ येथे आज संत गोरा कुंभार पुण्यतिथी

⚡मालवण ता.१७-: श्री संतश्रेष्ठ गोरा (गोरोबाकाका) कुमार यांची पुण्यतिथी व सत्यनारायण महापूजेनिमित्त दि. १८ एप्रिल रोजी कुंभारमाठ येथे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सकाळी ९ वा. संत गोरोबाकाका मिरवणूक सोहळा, ११ वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वा. तिर्थप्रसाद, सायंकाळी ६ वा. अष्टविनायक भजन मंडळ, साळेलच्या बुवा अंकिता गावडे (पखवाज : योगेश सामंत, तबला : गजानन देसाई) यांचे भजन, रात्री ९ वा. बक्षीस वितरण समारंभ, १० वा. देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘रक्तजल डोहाळे’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन कुंभारमाठ ग्रामस्थ मंडळाने केले आहे

You cannot copy content of this page