भाऊ स्पोर्टस् माडखोल उपविजेता;परशुराम उपरकर वाढदीनी सावंतवाडी मनसे आणि शिवप्रेमी मित्रमंडळ आरोस यांचे आयोजन
⚡सावंतवाडी ता.१७-: येथीर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी व शिवप्रेमी मित्र मंडळ आरोस यांच्या संयुक्त विद्यमाने मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाश जोतातील दोन दिवसीय भव्य खुली अंडर आम स्पर्धा भरविण्यात आली होती.या सार्थक स्पोर्ट वज्राट हा संघ विजेता ठरला तर उपविजेता भाऊ स्पोर्ट्स माडखोल ठरला असून सदर स्पर्धेचे आयोजन मनसेचे माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक व महाराष्ट्र सैनिक नंदू परब व शिवप्रेमी मित्र मंडळ यांनी केले.
या स्पर्धेचे उद्घाटन मनसेचे माजी सावंतवाडी तालुका संपर्क अध्यक्ष महेश परब तसेच मंदार नाईक यांनी केले व बक्षीस वितरण समारंभ हा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी विभागअध्यक्ष मंदार नाईक जिल्हा सचिव संदेश शेटये नंदू परब सहसचिव मनोज कांबळी माजी तालुका सचिव आबा चिपकर माजी शाखा अध्यक्ष प्रवीण आरोसकर मुकुंद धारगळकर यशवंत गोडकर सुनील नाईक आदी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
