नगरसेवक विशाल मांजरेकर यांचा देवगड मधील संस्थांकडून विशेष सत्कार

⚡देवगड ता.१६-: देवगड जामसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक व आरोग्य शिक्षण सभापती विशाल मांजरेकर हे स्वतः सफाई गाडीवर सारथी बनून कचरा संकलन केले व एक नवा आदर्श घालून दिला त्याबद्दल देवगड मधील आंतरराष्ट्रीय ह्युमनराईट्स संस्था,देवगड शहर ग्रामस्थ मंडळ ,हनुमान युवक क्रीडा मंडळ याच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन देवगड येथे करण्यात येऊन त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. नगरपंचायतीचे सफाई कामगार व घंटागाडी चालक हे संपावर गेले असता नाच्या काळात देवगड चे नगरसेवक विकास विशाल मांजरेकर यांनी स्वतः घंटागाडी देवगड जामसंडे मध्ये फिरवून या परिसरातील कचरा आपण व आपल्या अन्य सहकारी समवेत घंटागाडीने गोळा केले व देवगड वासीय जनतेत आदराची भावना निर्माण केली त्यांच्या या सेवे बद्दल देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळ व हनुमान क्रीडा मंडळ देवगड तसेच आंतरराष्ट्रीय मानवअधिकार राजदूत संघटना देवगड यांच्यावतीने श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.या निमित्ताने अध्यक्ष निशिकांत साटम दयानंद तेली,उपाध्यक्ष विलास रुमडे सुरेश सोनटक्के, मधुसूदन फाटक,तुकाराम तेली,शामल जोशी व अन्य यांनी गुणगौरवपर विचार मांडले. यावेळी देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष निशिकांत साटम उपाध्यक्ष प्रदीप सावंत, नगरसेवक नितीन बांदेकर ,सुधीर मांजरेकर ,सुरेश सोनटक्के सदानंद सावन्त, सावंत अनिल खडपकर व हनुमान क्रीडा मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष विलास रूमडे,मधुसुदन फाटक तसेच मानव अधिकार राज्य संघटनेचे अध्यक्ष दयानंद तेली उपाध्यक्ष विलास रूमडे, सचिव रविंद्र कांदाळगावकर,मीडिया अध्यक्ष दयानंद मांगले,महिला अध्यक्ष दीक्षा तेली, तसेच महिला जिल्हाध्यक्ष दीपिका मेस्त्री देवगड संपर्कप्रमुख रविकांत चांदोस्कर तसेच सदस्य प्रदीप राऊत उमेश कुबडे सौ शामल जोशी सौ शिवांगी भिडे सौ शुभांगी तेली,तुकाराम तेली खजिनदार गिरीश धोपटे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page