आम.नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ;देवगड पर्यटनला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविणार आम.नितेश राणे
⚡देवगड ता.१६-; देवगड तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पर्यटक यावेत, यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत. देवगड तालुक्यात पर्यटनवृद्धी व्हावी, याकरिता जे जे काय करता येईल, ते आम्ही करणार आहे.
भाजपच्या माध्यमातून मिसळ महोत्सव आयोजित केला आहे, याचा पर्यटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे आमदार नीतेश राणे यानी केले . देवगडच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जे जे शक्य आहे, ते केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या देवगड मधील मिसळ महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, मिसळ महोत्सवाकरिता देवगडकरांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली आहे. मिसळ महोत्सवाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, जि प च्या माजी सभापती सावी लोके,जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे,संदिप साटम डॉ अमोल तेली प्रकाश राणे,माजीअर्बन बँक चेअरमन सदाशिव ओगले, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर प्रणाली माने, प्रियांका साळसकर नगरसेविका तन्वी चांदोसकर, आद्या गुमास्ते, ऋचाली पाटकर,मनीषा जामसंडेकर प्रियाका साळस्कर,, संतोष किजवडेकर शहर अध्यक्ष दयानद पाटील योगेश पाटकर माजी जि प सदस्य मनस्वी घारे मिलिंद माने यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
या पुढे बोलताना आम नितेश राणे म्हणाले,देवगड परिसराला पर्यटन दृष्ट्या महत्व असून या ठिकाणी आयोजित केलेल्या मिसळ महोत्सवाच्या माध्यमातून याठिकाणी जिल्ह्यातील पर्यटक आणि जिल्ह्याबाहेरील पर्यटक येतील व येथील पर्यटन बरोबर वेगवेगळ्या मिसळीचा आस्वाद घेतील या चांगल्या उपक्रमातून येथील पर्यटन वाढीस लागावे हाच देवगड भाजपचा उद्देश असून सत्ता असो व नसो विधायक कार्य भाजपच्या माध्यमातून सुरूच राहणार आहे.असेही आम.नितेश राणे म्हणाले,
या मिसळ महोत्सवाचे उदघाटन आम.नितेश राणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.तसेच या महोत्सवात सहभागी झालेल्या
व्यावसायिकांनी आम.नितेश राणे यांचा सन्मान केला.या महोत्सवात आम.नितेश राणे यांनी विविध मिसळ स्टॉलला भेट देऊन आस्वाद घेतला.
