दिंडोशी विधानसभा अंतर्गत मनविसेचे आयोजन
बांदा/प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना दिंडोशी विधानसभा आयोजित वक्तृत्व स्पर्धेत बांदा केंद्र शाळेचा इयत्ता चौथीत शिकणारा विद्यार्थी नील नितीन बांदेकर याने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
वक्तृत्वाचा विषय ‘शिवरायांचे बालपण’ असा होता. ही स्पर्धा ऑनलाइन घेण्यात आली होती. या स्पर्धेच्या निकालाच्या वेळी खास लोकाग्रहस्तव नील चा व्हिडिओ मोठ्या पडद्यावर दाखवला गेला तेव्हा प्रेक्षकांकडून टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. नीलने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन १३२ पारितोषिके पटकाविली आहेत.
त्याच्या या यशात बांदा केंद्र शाळेतील समस्त शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, त्याचबरोबर आई आणि वडील श्री व सौ. गौरी नितीन बांदेकर यांचा मोलाचा असा सहभाग आहे. विविध स्तरातून नीलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
फोटो :-
नील बांदेकर.
