पतंजली योग समितीच्या वतीने बांदेश्वर मंदिर परिसरात साफसफाई

⚡बांदा ता.१६-: सोमवारी होणा-या श्री देव बांदेश्र्वर मंदिर कलशारोहण सोहळ्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने रविवारी सकाळी बांदा येथील योग समितीच्या वतीने बांदेश्र्वर मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली.
सोमवारी बांदेश्वर मंदिराच्या सातवा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असून या दिवशी मंदिर परिसरात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे‌ आयोजन करण्यात आले आहे.
बांदा येथील पतंजली योग समितीच्या वतीने वर्षभर अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात . मंदिर परिसराची साफसफाई करण्यासाठी ही ३०हून‌ योग साधक सहभागी झाले होते. पतंजली योग समितीच्या या उपक्रमाबद्द देवस्थान कमिटीच्या वतीने समाधान करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page