संजू परब ; एका दिवसाच्या बाजाराने तलावाचे सौंदर्य बाधित होणार नाही
⚡सावंतवाडी ता.१६-: मोती तलावा काठवरच आठवडा बाजार योग्य आहे, स्वार हॉस्पिटल समोरील पर्यायी जागा नागरिकांसाठी खूप लांब आहे, शिवाय पावसाळ्यात येथे अनेक समस्या उद्भवतील एका दिवसाच्या आठवडा बाजाराने तलावाचे कुठल्याच प्रकारे सौंदर्य अबाधित होत नाही अशी भूमिका माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी मांडली.
दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शहरातील चार ठिकाणच्या आठवडा बाजाराच्या जागा हाॅकर्स संघटनेला मान्य नसतील तर हॉस्पिटल समोरची जागा पर्याय म्हणून निवडण्यात येईल असे सांगितले होते याबाबत श्री परब यांना विचारले असता त्यांनी आपली भूमिका मांडली.
