भाजप महाविजय अभियानाचा गांधीचौकात होणार समारोप!

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली : बुधवार 19 रोजी सावंतवाडीत भव्य सभा

⚡सावंतवाडी ता.१६-: येथील भाजप तर्फे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महाविजय संपर्क अभियान राबविण्यात आला होता त्याचा समारोप 19 तारीखला सावंतवाडी गांधीचौकात भव्य सभेने समारोप होणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली.

दरम्यान या ही भाजप प्रदेश सचिव निलेश राणें, चित्रा वाघ, व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे तेली यांनी यावेळी सांगितले ते सावंतवाडीत भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी तेली बोलताना म्हणाले की राज्यात भाजप-शिंदे सरकारर जरी असले तरी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्यामुळे आमचा प्रयत्न शतप्रतिशत भाजप करायच असून मग युती करायची की नाही हे वरिष्ठांच्या आदेशानुसार मग आम्ही ते ठरवू असे तेल यांनी यावेळी सांगितले.

यावेळ भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी, अजय सावंत बंटी पुरोहित आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page