⚡कणकवली ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध पक्षांमध्ये आणि अनेक संघटनांमध्ये बरेच नेते कार्यरत असतात. त्यातील काही नेते हे एखाद्या विषयापुरते प्रकाशझोतात येतात. त्यांना प्रसिद्धीसुद्धा मिळत असते परंतु काही काळाने त्यांची पक्षातच हळूहळू पीछेहाट होत असते. कारण सर्व प्रकारचे नेतृत्व देण्यात ते कमी पडत असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल महाराष्ट्र चॅनल कडून घेण्यात आला हा धावता आढावा.
मात्र माजी आम.परशुराम उपरकर यांच्याकडे सर्व प्रकारचे नेतृत्व करण्याची क्षमता हि उपजतच असल्याने ते कोणत्याही पक्षात असले तरी सर्वसामान्य जनतेचा आवाज उठविणारा नेता म्हणून ते लोकप्रिय झाले आहेत. अगदी शालेय जीवनापासून त्यांनी सामाजिक कार्याचा वसा हाती घेतला आहे. शिवसेना पक्षाचे काम सुरू केल्यानंतर त्यांनी विद्यार्थी सेनेच्या माध्यमांतून संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील तरूणांची संघटना बांधणी केली. त्यांच्या बेधडक अशा कार्यपद्धतीकडे आकर्षित होऊन १९९०च्या काळात शेकडो तरूण शिवसेनेमध्ये दाखल झाले. मावळयांचा व बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून भगवा झेंडा खांद्यावर घेऊन हजारो तरुण जीजींच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय होऊन काम करू लागले. सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी या जिल्ह्यामध्ये शेकडो मोर्चे काढले. महागाई, रस्ते वीज, पाणी, शेतकऱ्याचे व मच्छिमारांचे प्रश्न, धरणांचे प्रश्न, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे फि वाढ व इतर प्रश्नांसाठी सातत्याने शासनाशी संघर्ष केला. शिवसेनेतील त्यांच्या सततच्या कार्यामुळे जनतेने त्यांना ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य म्हणून वेळोवेळी निवडून दिले जिल्हा परिषदेमध्ये प्रथमच बांधकाम सभापती म्हणून काम करताना त्यांनी आपल्या पारदर्शक कार्याचा वेगळा ठसा उमटविला त्यानंतर पक्षाने म्हणजेच हिंदूहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या विधानपरिषदेतील आमदारकीमुळे ते संपुर्ण महाराष्ट्रात सुपरिचित झाले. विधानपरिषदेत निवडून गेल्यापासून त्यांनी आपल्या अभ्यासवृत्तीची चुणूक दाखविली. आपल्या जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न विधानपरिषदेत सातत्याने मांडून ते सोडविण्याचा प्रयत्न केला. या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकवेळी होणारी पुरपरिस्थिती, वादळांमुळे होणारे शेतकऱ्याचे व मच्छिमारांचे आर्थिक नुकसान भरून देण्यासाठी त्यांनी विधानपरिषदेमध्ये वेळोवेळी आवाज उठविला. अनेक गावांतील रस्त्यांचे प्रश्न ,सिंधुदुर्गातील धरणग्रस्त शेतकऱ्याचे प्रश्न, नळ योजनांचे प्रश्न, शेक्षणिक असुविधांविषयी असलेले प्रश्न जिल्ह्यातील जंगलतोड, छोटया मोठया पुलांचे प्रश्न, दवाखान्यातील डॉक्टर्स व औषधे पुरवठयाचा प्रश्न,एस्.टी. वाहतूक, अन्यायग्रस्त नागरीकांचे व्यक्तिगत प्रश्न, प्रशासनातील त्रुटी असे शेकडो प्रश्न त्यांनी वारंवार विधानपरिषदेच्या प्रत्येक अधिवेशनात उपस्थित केले. मच्छिमारांच्या प्रश्नांवर तर त्यांनी प्रत्येक अधिवेशनात आवाज उठवून मच्छिमारांना
मदत करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. तळागाळातील प्रत्येक गावात त्यांच्या असलेल्या दांडग्या संपर्कातून इत्यंभूत माहिती मिळवून भांडाफोड करण्याची कसब जीजींकडे आहे.
आक्रमकमणा आणि बेधडकपणे एखादी गोष्ट मांडताना त्यांनी सत्यवस्तुस्थिती जनतेसमोर व आणि प्रशासनासमोर आणण्याचे प्रयत्न केले. अनेक प्रश्नांमध्ये इतर नेत्यांनी केलेली जनतेची दिशाभूल थांबविण्यासाठी वेळोवेळी माहितीच्या अधिकारांचा वापर करून सत्य उघड केले. प्रत्येक विषयांवर खोलात जाऊन अभ्यास करताना शासकीय नियम व कायदे यानुसार माहिती देत जिल्ह्यातील अनेक खात्यांतील अधिकाऱ्याच्या गैरकारभारावर अंकुश ठेवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. कितीही नवीन अधिकारी या जिल्ह्यात प्रशासकीय कारभार करण्यासाठी आले असले तरी त्यांचेकडून योग्य माहिती मिळविणे आणि जनतेच्या प्रश्नांवर न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचे काम जीजी उपरकर हे एकमेव माजी आमदार करीत असतात. इतर पक्षाच्या नेत्यांकडे वारंवार खेपा मारूनसुद्धा काम होत नाही म्हटल्यावर अनेक लोक जीजींकडे धाव घेतात.
अलिकडेच श्री. परशुराम उपरकर यांनी सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमधील अधिकाऱ्यांचे गैरव्यहाराचे बिंग फोडून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास भाग पाडले. सार्वजनिक बांधकाम आरोग्य, महसूल, वनविभग, जिल्हा परिषद वैगरे अनेक खात्यातील त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्यपद्धीमुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांना योग्य उत्तरे देण्यास ते भाग पाडीत असतात. इतर लोकांना नकोती कारणमीमांसा सांगून विलंब लावण्याची पद्धत अधिकाऱ्यांमध्ये दिसून येते. त्याला चाप लावण्याचे काम परशुराम उपरकर हे करीत असतात.गेली ४० वर्षे श्री.परशुराम उपरकर यांनी विरोधी पक्षामध्ये आणि सत्तेत सुद्धा काम केले असल्याने आणि ग्रामपंचायतीपासून आमदार म्हणून वरिष्ठ पदांवर काम केल्याने त्यांना तळागाळापासूनची सर्व कार्यपद्धती माहिती आहे. अनेकजण माहितीच्या अधिकाराचा वापर करून माहिती मिळवित असतात. परंतु त्या माहितीचा नेमका कुठे व कधी वापर करावा आणि पुढे काय करावे हेच समजत नसते. परंतु जीजी उपरकर वेळ येताच योग्य वेळी दिलेल्या माहितीच्या आधारे संबंधितांना जाब विचारतात. आणि ती जनतेपुढे आणतात.
सन १९८३ पासूनच स्वर्गीय बाळासाहेबांचा सच्चा शिसैनिक म्हणून ओळख असलेले जीजी उपरकर यांनी सुरूवातीपासून अनेक वेळा संघर्ष केला. आंदोलनांच्या काळात पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाल्या. वेळोवेळी जनतेसाठी त्यांना तुरूंगवास भोगावा लागला. परंतु त्यांनी नेहमीच आपल्या पक्षहितासाठी नेटाने व प्रामाणिकपणे काम केले. मात्र त्यांच्या कार्यात त्यांच्याच पक्षातील अंतर्गत सुप्त संघर्षातून त्यांनी शिवसेना सोडून मा.राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसेमध्ये प्रवेश केला. मनसेचे सिंधुदुर्गात कार्यकर्ते कमी असले तरीही नेता म्हणून जीजींनी संपुर्ण जिल्ह्यामध्ये विविध आंदोलने केली आहेत. निवडणुका लढल्या आहेत. ग्रामीण भागापर्यंत मनसेचे कार्य
लोकांपर्यंत पोचवण्यात यशस्वी झाले आहेत. मनसेचे सरचिटणीस म्हणून त्यांनी आपले कार्य जोमाने व निष्ठेने सुरू ठेवले आहे. सिंधुदुर्गातील महामार्गाच्या चौपदरी करणाच्या प्रश्नावर त्यांनी मनसेतर्फे आंदोलने केली. शिवाय त्यांनी हायकोर्टापर्यंत दाद मागून जनतेला न्याय देण्याचा प्रसत्न केला. टोलवसुली आंदोलन,कोविड मधील गोरगरीब लोकांना आरोग्य विभागापर्यंत मदतीचा हात देणे, पर्यावरणाच्या प्रश्नांवर आवाज उठवणे, मायनिंगमधील बेकायदेशीर उत्खनने, झाडे तोड, आणि सध्याच्या जीवघेण्या महागाई वाढीच्या प्रश्नांवर जीजी उपरकर सातत्याने जनतेसोबत काम करीत राहीले आहेत.
कुणाशीही संघर्ष करावा लागला तरी जीजी उपरकर मागे हटणारा माणूस नाही हे त्यांनी २००५ च्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये मा. नारायणराव राणे यांच्याविरूद्ध संघर्षात निवडणूक लढवून शिवसेनेची ताकद जिवंत ठेवली असे धाडस त्यावेळी कुणीही दाखवू शकलेले नाही. मात्र त्यावेळपासून जीजींचे नाव सर्वदूर महाराष्ट्रात पोहोचले की,अशा निधड्या छातीचा एक मावळा सिंधुदुर्गात आहे. की, जो कुणाशीही पंगा घेऊ शकतो. तो केवळ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शब्दासाठी आपला जीव पणाला लावू शकतो.
असे असले तरी जीजींनी आपल्या राजकीय जीवनामध्ये कधीही फायद्यातोटयाचा विचार केलेला नाही. सर्वसामान्य जनतेच्या हितरक्षणासाठी लढत राहून संघर्ष करणे हेच त्यांचे जीवन बनले आहे. २ वर्षाच्या जीवावर बेतलेल्या आजारपणानंतरही त्यांचा धडाका चालूच आहे. आणि तो चालून राहावा यासाठी आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दिर्घायुष्य लाभावे म्हणून आमच्या लाख लाख शुभेच्छा !
