भाजपने कोणाला तिकीट द्यायची हा पक्षाचा प्रश्न

घोषणाबाज, टामटुम मंत्र्यांची बाजू घेताना राजन पोकळे, अशोक दळवी यांनी भान राखावे;प्रवक्ते संजू परब यांनी दिले प्रत्युत्तर

सावंतवाडी ता.१२-: राजन तेली हे सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी विकासकामांसाठी भरघोस निधी दिला आहे. त्यामुळे वक्तव्य करण्यापूर्वी याच भान केसरकर समर्थक माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे व जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी ठेवावं. फुकटची वायफळ बडबड करू नये, कुणाला तिकीट द्यायच हा आमच्या पक्षाचा प्रश्न आहे. दीपक केसरकर यांच्यासारख दिलीप नार्वेकर, प्रविण भोसले, शरद पवार, नारायण राणे यांना फसवण्याच काम आम्ही केलं नाही. केसरकर आता एकनाथ शिंदेंना सुद्धा फसवतील, त्यांची फसवण्याची संस्कृती आहे. १३ वर्षात कुणाला नोकरी देऊ शकले नाही. घोषणाबाज टामटूम शिक्षणमंत्री ते आहेत असा टोला भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी हाणला.

नगरपरिषद डोळ्यासमोर ठेवून केसरकर राजकारण करत आहेत. हे विकास करू शकत नाही. त्यामुळे पोकळे, दळवींनी आदी केसरकरांना आवरावे नंतर आमच्या नेत्यांवर बोलावं.

You cannot copy content of this page