ऑल इंडिया ब्रेन डेव्हलपमेंट स्पर्धेत रेवतळे शाळेचा १००%निकाल

मालवण दि प्रतिनिधी
ऑल इंडिया ब्रेन डेव्हलपमेंट स्पर्धा परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत जिल्हा परिषद शाळा रेवतळे मालवणचा निकाल १००% लागला असून इयत्ता चौथी मधील कु लेईशा नारायण पराडकर हिने ८६ गुण मिळवीत रौप्य पदक पटकाविले

या परीक्षेत श्रीवर्धन संदीप पारकर (इयत्ता तिसरी , ८e गुण), अवि अमर वाघमारे (इयत्ता दुसरी , ८५ गुण), शैलजा राजीव केंद्रे ( इयत्ता दुसरी, ८५ गुण) श्रावणी संदीप पारकर ( इयत्ता दुसरी, ८५ गुण) आराध्य नारायण पराडकर ( इयत्ता पहिली, ८८ गुण) हे कांस्य पदकाचे मानकरी ठरले आहेत. तसेच शौनक शैलेश पावसकर ( इयत्ता तिसरी, ८१ गुण) पर्णिका प्रताप चिपकर ( इयत्ता दुसरी, ८० गुण) दुर्वा निलेश शिरोडकर (इयत्ता दुसरी, ७८ गुण) धनश्री प्रशांत परब ( इयत्ता तिसरी ७४ गुण) हे उत्तीर्ण झाले .

या यशस्वी विदयार्थ्यांचे मुख्याध्यापिका रोहिणी देशमुख, शिक्षिका प्रिया सावन्त मॅडम , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, शिक्षक, सर्व पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page