नवाबाग समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळली 55 वर्षीय महिला

⚡वेंगुर्ले ता.११-: उभादांडा–नवाबाग किनाऱ्यावर सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारांस सुमारे ५५ वर्षीय महिलेचा आढळून आला. याबाबत स्थानिकांनी वेंगुर्ले पालीस स्टेशनला दिलेल्या खबरीनुसार त्याचा पोलीस पंचनामा करण्यांत आला असून वेंगुर्ले पोलीस स्टेशनला अकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.

उभादांडा-नवाबाग समुद्र किनाऱ्यावर सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आढळून आलेल्या सुमारे ५५ वर्षीय महिलेबाबतची खबर स्थानिक मच्छिमार निलेश खडपकर यांनी वेंगुर्ले पोलीसांत दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर, हेड कॉन्स्टेबल योगेश वेंगुर्लेकर व महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा देसाई यांनी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. सदरच्या महिलेचा मृतदेह हा ताजा असल्याने ती वेंगुर्ले तालुक्याच्या परीसरातील असावी. अशी शक्यता स्थानिक मच्छिमारांतून वर्तविली जात आहे. सदर महिला हि सुमारे ५ फुट उंचीची, गोऱ्या रंगाची, मध्यम बांध्याची, लाल रंगाचा ब्लाऊज परीधान केलेली. केस थोडे पांढरट-काळे रंगाचे असलेली अशी आहे. अशा प्रकारच्या महिलेबाबत नाव-गांव- पत्ता कोणालाही माहिती असल्यास संबंधितांनी वेंगुर्ले पोलीस स्टेशनला कळवावे. असे आवाहन वेंगुर्ले पोलीस स्टेशनतर्फे करण्यांत आले आहे.
या अकस्मित मृत्यू प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अनुराधा देसाई या करीत आहेत.

You cannot copy content of this page