विनायक राऊत ;आंबोली येथील बीएसएनएल टॉवरचे लोकार्पण सोहळा संपन्न…
आंबोली,ता.८ : पावसाळ्यापूर्वी येथील बीएसएनएल च्या दोन्ही मोबाईल टॉवर साठी बॅटरी बॅकअप उपलब्ध करून देण्यात येतील त्यासाठी सोमवारी मुंबई येथील कार्यालयात जाऊन बैठक घेण्यात येईल असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी आंबोली येथे उदघाटन प्रसंगी केले. आंबोली नांगरतास येथील बीएसएनएल मोबाईल टॉवर उदघाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, बाळा गावडे,जान्हवी सावंत,शब्बीर मणियार,आंबोली विभागीय अध्यक्ष बबन गावडे, संतोष पाताडे,शाखा प्रमुख नारायण कोरगावकर, डुबाजी राऊत, काशिराम राऊत,विठ्ठल डोंगरे,लक्ष्मण गावडे, कान्हाजी गावडे, बिरु काळे,लक्ष्मण पटकारे,श्री नाटलेकर,विठ्ठल गावडे, तानाजी गावडे,दशरथ गावडे,अरुण गावडे तसेच नांगरतास येथील ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी खासदार विनायक राऊत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.नांगरतास धनगरवाडी येथील रस्त्यासंदर्भात ग्रामस्थांनी निवेदन दिले.
