तेली समाज बांधवांकडुन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे मागणी
⚡कणकवली ता.०५-: कणकवली तेलीआळी येथील ” संत जगनाडे महाराज चौकाचे ” सुशोभीकरण करण्यात यावे अशी आग्रही मागणी कणकवली तालुका तेली समाज बांधवांकडून कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून संत जगनाडे महाराज चौकाचे नगर पंचायत मार्फत सुशोभीकरण करण्याचे आश्वासन तेली समाज बांधवांच्या शिष्टमंडळाला देण्यात आले.
यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष – दत्ताराम हिंदळेकर, कोशाध्यक्ष – विशाल नेरकर, सदस्य- सुरेश मालंडकर, भरत तळवडेकर, जिल्हा सचिव- परशुराम झगडे, जिल्हा कोशाध्यक्ष – चंद्रकांत तेली, सल्लागार – चंद्रकांत (तात्या) कुवळेकर, आभा तेली, मार्गदर्शक – नंदकुमार आरोलकर, माजी नगरसेविका सौ.वैशाली आरोलकर तसेच आशिष वालावलकर, प्रसाद आरोलकर, गौरेश डिचोलकर आदि समाज बांधव उपस्थित होते.