राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कासार्डे विदयालयाच्या खेळाडुंची १६ पदकांवर मोहर

दोन सुवर्ण पदकांसह ६ रौप्य तर ८ कांस्य पदकाचा समावेश

⚡कणकवली ता.०५-: इंडियन मार्शल आर्ट अकॅडमी व इंडियन गेन्श्युरियो कराटे डो फेडरेशन यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘अखिल भारतीय “मुंबई खुली कराटे अजिंक्यपद -२०२३” या राष्ट्रीय स्पर्धेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेच्या खेळाडूंनी विविध वजनगट व वयोगटातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातर्फे खेळताना कराटे मधील कुमिते आणि काता प्रकारातून तब्बल १६ पदकांवर आपली मोहर उमटवली आहे.
यामध्ये २ सुवर्ण पदके,६ रौप्य पदके आणि ८ कास्यपदकांचा समावेश आहे.
या स्पर्धेतील सर्व यशस्वी कराटेपट्टू हे कासार्डे माध्यमिक विद्यालयात सूरू असलेल्या ज्युदो व कराटे प्रशिक्षण वर्गात गेली अनेक वर्षे कठोर मेहनत घेत आहेत.
यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे-:
कु.विधी संजय चव्हाण -काता प्रकारात- सुवर्णपदक
कु.रिध्दी प्रशांत राणे –काता प्रकारात-रौप्य पदक तर कु. ऋतूजा धनाजी शिंदे –काता प्रकारात-कास्य पदक
कु.सना रहिमान शेख –काता प्रकारात-रौप्य पदक, अमोल दिपक जाधव या खेळाडूने – कुमिते प्रकारात – सुवर्ण पदक व काता प्रकारात- रौप्य पदकाचा मानकरी ठरला आहे.
कु.सावनी प्रशांत शेट्ये कु.अनुष्का दिपक जाधव,कु.रिध्दी अरविंद परब ,कु.दुर्वा प्रकाश पाटील यांनी –काता प्रकारातून- रौप्य पदकाची कमाई केली आहे तर, कु.साक्षी संतोष तेली व कु.साक्षी विनायक सरवणकर या दोघींनी –काता प्रकारातून-कास्य पदक पटकावले आहे.
तसेच कॅडेट गटातून- विश्वास चंदू चव्हाण, ज्युनिअर गटातून -पार्थ प्रकाश पाटील, युवराज संजय राठोड आणि सिनियर गटातून -तुषार गोविंद जाधव या खेळाडूंनी कांस्य पदकाची कमाई केली आहे.
या यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा राष्ट्रीय पंच ,प्रशिक्षक व सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड,कराटे असोसिएशनचे जिल्हा पदाधिकारी तथा प्रशिक्षक,पंच अभिजित शेट्ये,रुपेश कानसे,सोनू जाधव,सौ.शिल्पा शेट्ये, यांच्यासह अन्य प्रशिक्षकाचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी खेळाडूंचे कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे सर्व पदाधिकारी तसेच स्थानिक व्यवस्था समिती आणि स्कुल कमिटीचे सर्व पदाधिकारी, विद्यालयचे प्राचार्य एम.डी.खाड्ये,पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर,सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अभिनंदनीय यश संपादन केलेल्या या खेळाडुंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page