आचरा – कुडाळ बसफेरी पुन्हा सुरू

प्रवाशांची गैरसोय टळली

मालवण (प्रतिनिधी)

बंद झालेली आचरा- कुडाळ ही बसफेरी मालवण आगाराच्या वतीने पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सकाळी ५:३० वाजता आचरा येथून सुटून तोंडवळी तळाशील कांदळगाव राणेवाडी मार्गे मालवण कुडाळ अशी ही सकाळी बसफेरी तर सायंकाळी कुडाळ येथून ५:४५ वाजता सुटून मालवण ६:४५ व राणे वाडी मार्गे आचरा अशी बसफेरी असणार आहे.

यापूर्वी कुडाळ आगाराच्या वतीने ही बसफेरी सुरू होती. मात्र ती बंद झाली होती. मात्र या बसफेरीसाठी प्रवाशांकडून मागणी आल्याने प्रवाशांचे हित लक्षात घेऊन मालवण आगार प्रमुख सचेतन बोवलेकर यांनी वरिष्ठांकडे पाठपुरावा करून ही बसफेरी सुरू केली आहे. याबाबत प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page