भाजपचे ५ पासून जनसंपर्क अभियान

जिल्हाध्यक्ष राजन तेली;केंद्र व राज्य शासनाच्या योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी उपक्रम

⚡सावंतवाडी ता.०४-: येथील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ५ ते १२ तारीख पर्यत जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली. दरम्यान केंद्र सरकार व राज्य सरकारने जी विकास कामे केली आहेत. तसेच २०२२-२०२३ बजेट सादर केले ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी व जनतेच्या ज्या काय समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याचे यावेळी तेली म्हणाले. ते सावंतवाडी भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी तेली बोलताना म्हणाले सर्व सामान्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी व मोदी सरकारच्या योजना तळागाळा पर्यंत पोहचवण्यासाठी हे उपक्रम प्रदेश कडून जाहीर करण्यात आले असून यासाठी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे. यात सावंतवाडी तालुक्यात 5 रोजी कार्यक्रम होणार असून 9 ते 10 रोजी दोडामार्ग तर 11 रोजी वेंगुर्ले तालुक्यात हा कार्यक्रम होणार आहे. याचा समोरोप सावंतवाडीत 12 रोजी सायंकाळी 6 वा. होणार आहे. त्यानंतर लवकर भाजपची सावंतवाडी गांधी चौकात जाहीर सभा होणार असल्याचेही तेली म्हणाले.

यावेळी संजू परब, मनोज नाईक, आनंद नेवगी, रवि मडगावकर, महेश धुरी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page