⚡वेंगुर्ले ता.०३-: ब्रेन डेव्हवपमेंट परिक्षेत मदर तेरेसा इंग्लीश मीडीयम वेंगुर्ला या शाळेत इयत्ता पहिलीत शिकणारी कु.दिया योगेश धुरी ने सुवर्णपदक प्राप्त करून वेंगुर्ले तालुक्यात प्रथम तर राज्य गुणवत्ता यादीत ७० वा क्रमांक प्राप्त केला आहे.
८जानेवारी २०२३ मध्ये संपन्न झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट या परीक्षेत दियाने १०० पैकी ९० गुण मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तिच्या या उज्ज्वल यशाबद्दल मुख्याध्यापकांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. तिला शाळेचे मुख्याध्यापक अँथनी डिसोझा, वर्गशिक्षिका सबिना फर्नांडिस व पालक यांनी मार्गदर्शन केले. दियाच्या यशाबद्दल तिचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांनी अभिनंदन केले असून सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ब्रेन डेव्हलपमेंट परिक्षेत दिया योगेश धुरी ला सुवर्णपदक…
