मंत्री केसरकर, संजू परब यांचे नाव न घेता राष्ट्रवादीच्या पुंडलिक दळवी यांचा आरोप;मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल केल्यास केसरकर यांचा राष्ट्रवादी सत्कार करणार
⚡सावंतवाडी ता.०१-: राजकीय मंडळीनी आपल्या वजन वाढवण्यासाठी आपल्या मर्जीने आठवडा बाजार वेगळ वेगळ्या ठिकाणी भरवला जात आहे. त्यामुळे लोकांचा व व्यापारांचा विचार करून आठवडा बाजाराचा मुख्य केंद्र ठरावे फक्त आपली पोळी भाजण्यासाठी व निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही राजकीय मंडळी हे आठवडा बाजार बाबत एकमेकांवर टीका करण्याचा काम करत असल्याच आरोप राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आमदार दिपक केसरकर व माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर नाव न घेता टिका केली.
दरम्यान मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शहरात उभारण्याबाबत केसरकारनी नागरिकांना दिलेल आश्वासन जर पूर्ण केले तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा गांधी चौकात जाहीर सत्कार करेल, असे पुंडलिक दळवी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी दळवी पुढे बोलताना म्हणाले की काही राजकीय मंडळींनी आपल्या स्वतःचे वजन वाढवण्यासाठी यामध्ये हस्तक्षेप करत हा बाजार अन्य ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे ही राजकीय मंडळी स्वतःच्या मर्जीनुसार व्यापाऱ्यांना गृहीत धरून आपण जे काय करू आपल्या मताने सावंतवाडीत घडते असं वेगवेगळे निर्णय घेत आहेत त्यामुळे आठवडा बाजार होणार की लोकांचा बाजार होणार हा एक मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा व व्यापाऱ्यांचा विचार करून एक सुवर्ण मध्य काढून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन योग्य जागा ठरवावी असे दळवी यांनी यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान राज्यात सत्तेत असलेले पक्षाचे नेते मात्र एकमेकांवर टीका करून तसेच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरात कमी झालेलं राजकीय वजन पुन्हा निर्माण करण्यासाठी कुठेतरी आठवडा बाजाराचा विषय काढून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ही पुंडलिक दळवी यांनी केसरकर व संजू परब यांच नाव न घेता केली आहे.
यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला शहराध्यक्ष एडवोकेट सायली दुभाषी, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, शहर चिटणीस राकेश नेवगी, युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष ईफ्तेकार राजगुरू, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस , उद्योग व्यापार तालुका उपाध्यक्ष याकूब शेख, सौ पूजा दळवी आदी उपस्थित होते
