सुधाताई कामत जिल्हा परिषद शाळा न.२ च्या शेजारी लागली आग

सावंतवाडी : सुधाताई कामत जिल्हा परिषद शाळा नं.‌२ च्या शेजारी आग लागली.‌ भर दुपारी लागलेल्या या आगीने रूद्रावतार धारण केला. शाळा लगत असल्यानं लागलीच न.प.च्या फायर फायटरला पाचारण करण्यात आले. न.प.च्या बंबान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यावेळी देव्या सुर्याजी, नंदू गावडे, मेहर पडते, गौतम माठेकर, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page