ढोल वाजवत मंत्री केसरकरांना आश्वासनांची करून देण्यात आली आठवण

ठाकरे गटाचे एप्रिल फुल आंदोलन ठरले लक्षवेधी;मायकल डिसोझा यांनी केले नेतृत्व

⚡सावंतवाडी ता.०१-: दीपक केसरकर यांनी आता पर्यंत केलेल्या घोषणा, आश्वासने यांच्या आठवणी जाग्या झाल्या पाहिजे यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने एसटी बस स्थानकावर “एप्रिल फुल” ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.

यावेळी केसरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत निषेध करण्यात आला. हे आंदोलन जिल्हा परिषद माजी सदस्य मायकल डिसोजा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी पोलिसांचा देखील मोठा फौज फाटा तैनात होता.

यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार बाळा गावडे, गुणाजी गावडे, आबा सावंत, शब्बीर मणियार, जयेंद्र परुळेकर, शैलेश गावंढळकर, अजित सांगेलकर, श्रुतिका दळवी, भारती कासार, श्रेया कासार संगीता पेडणेकर अर्चना बोंद्रे आदी महिला व ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page