माडखोल येथील २८ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या …

⚡सावंतवाडी ता.२९-: माडखोल टेंबवाडी येथील २८ वर्षीय कृष्णा चंद्रकांत पालव या युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. हा प्रकार निदर्शनास येताच त्याच्या नातेवाईकांनी त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटनेची अधिक माहिती अशी की, संबंधित युवक गोव्यात कामाला होता. तेथून तो काल आपल्या घरी परतला. आज सकाळी त्याचे वडील गुरे चारण्यासाठी जंगलात गेले होते. तर आई घरात काम करत होती. यावेळी त्याने आपल्या घरातील बेडरूम मध्ये गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान मुलाला हाक मारल्यानंतर त्याच्याकडून प्रतिसाद न आल्याने आईने खोलीत जाऊन पाहणी केली. यावेळी तो गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. हा प्रकार निदर्शनास येताच तिने आरडाओरड केली. त्यावेळी आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी घरात येऊन त्याला गळफास लावलेल्या ठिकाणावरून खाली उतरले. व तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचा अधिक तपास सुरू आहे.

You cannot copy content of this page