वारकरी तथा जेष्ठ महिला लक्ष्मी गावडे यांनी फोडले श्रीफळ;
मंत्री केसरकर यांनी मागणी केली पूर्ण
⚡सावंतवाडी ता.२९-: तालुक्यातील आंबोली सतीचीवाडी ग्रामस्थांच्या – मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचा आमदार निधीमधुन आंबोली सतीचीवाडी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण शुभारंभ वारकरी संप्रदायाच्या जेष्ठ महिला श्रीमती लक्ष्मी गावडे यांचे हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे, आंबोली सरपंच सौ. सावित्री पालयेकर, शिवसेना विभाग प्रमुख विलास गावडे, शाखाप्रमुख हेमंत नार्वेकर, ग्रा.पं. सदस्य महेश पावसकर, माजी सरपंच जगन्नाथ गावडे, उपाध्यक्ष खरेदी विक्री संघ राजन रेडकर, विश्वास घाग,एकनाथ हळदणकर, विशाल बांदकर,विजया गावडे,जागृती गावडे, नंदु गावडे,तुषार गावडे, मोहन गावडे, कृष्णा गावडे, पिंटो गावडे,अंजली गावडे, तसेच शिवसैनिक व ग्रामस्थ मोठया संस्थेने उपस्थित होते.
वाडीवरील अंतर्गत रस्त्याचे काम मंजूर केलने मंत्री केसरकर यांचे वाडीवरील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करुन आभार व्यक्त केले.
