मालवण व्यापारी संघ अध्यक्षपदी उमेश नेरूरकर यांची फेर निवड

नेरूरकर २५ वर्षे सांभाळत आहेत कारभार;रवींद्र तळाशीलकर कार्यवाह

मालवण दि प्रतिनिधी
मालवण व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी उमेश नेरुरकर यांची तर कार्यवाह म्हणून रविंद्र तळाशीलकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे श्री नेरुरकर हे गेली २५ वर्षे मालवण व्यापारी संघाच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत

मालवण व्यापारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा हनुमान मंदिर सोमवारपेठ येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी सन २०२३- २८ या पाच वर्षांसाठी व्यापारी संघाची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी कार्यकारिणी निवडताना युवा चेहऱ्यांनाही संधी देण्यात आलेली आहे. यावर्षीचा व्यापारी मेळावा मालवण येथे होत असल्याने शहर व्यापारी कार्यकारिणीच्या निवडीला महत्व प्राप्त झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्यापारी महासंघाचे पदाधिकारी अरविंद नेवाळकर हे होते.

मालवण तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर यांच्या अध्यक्षतेखाली मालवण व्यापारी संघाची निवडणूक बाजारपेठेतील हनुमान मंदिरात घेण्यात आली. कार्यकारिणीसाठी एकास एक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने निवड प्रक्रिया बिनविरोध झाली. प्रमोद ओरसकर, उमेश नेरूरकर, नितीन वाळके, अशोक सावंत, अभय कदम, सरदार ताजर, नाना पारकर, मसुद मेमन, महेश अंधारी, विजय शिवा चव्हाण, हर्षल बांदेकर, दीपक भोगले, मंदार ओरसकर, नितीन तायशेटे, हरेश देऊलकर, ऋषिकेश नेवाळकर, संदीप शिरोडकर, उमेश हनुमंत शिरोडकर, दिनेश मुंबरकर, महेंद्र पारकर, गणेश प्रभूलकर, अमोल केळुसकर, मुकेश बावकर, सुनिल परूळेकर, विजय केनवडेकर, अरविंद नेवाळकर, मनोज चव्हाण, हेमंत शिरपुटे, अरविंद सराफ, नाना साईल, बाळू तारी आदी उपस्थित होते. यावेळी ओरसकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

मालवण शहर व्यापारी पंचवार्षिक निवडणूक २०२३ विहित मुदतीत प्रत्येक विहित पदासाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन पत्र दाखल होऊन विहित मुदतीत कोणीही नामनिर्देश पत्र मागे न घेतल्याने रितसर बिनविरोध निवडून आलेल्यांची नावे 1 अध्यक्ष उमेश नेरूरकर, उपाध्यक्ष दीपक उर्फ नानाशेठ पारकर, अशोक सावंत, कार्यवाह रविंद्र तळाशीलकर, सह कार्यवाह — गणेश प्रभूलकर, सदस्य हर्षल बांदेकर, संदीप अभय कदम, कोषाध्यक्ष • शिरोडकर, मंदार ओरसकर, अमोल केळूसकर, हरेश देऊलकर, शैलेश मालंडकर, सरदार ताजर, विजय चव्हाण, योगेश बिळवसकर, उमेश शिरोडकर, महेंद्र पारकर स्विकृत सदस्य श्रीकृष्ण तारी, अरविंद ओटवणेकर, दिनेश मुंबरकर, हेमंत शिरपुटे. कायम निमंत्रीत प्रमोद ओरसकर, दशरथ कवटकर, नितीन तायशेटे, नितीन वाळके, विजय केनवडेकर, महेश अंधारी, गोविंद (आपा ) चव्हाण, सुहास ओरसकर, विठ्ठल साळगावकर, सुनिल परूळेकर, पांडू करंजेकर, मुकेश बांवकर, राजा शंकरदास, मसूद मेमन, अरुण साईल. यांची निवड यावेळी करण्यात आली.

व्यापारी मेळावा जल्लोषात करणार

यावेळी मालवणात व्यापारी मेळावा जल्लोषात करण्याचा निर्णय घेण्यात आला. नितीन वाळके यांनी बोलताना आपण तरूण असताना ज्येष्ठांनी ज्या पद्धतीने माझ्या खांद्यावर व्यापारी संघाची जबाबदारी सोपविली होती, ती आता खऱ्या अर्थाने पुढील व्यापारी पिढीकडे जबाबदारी सोपविली जात असल्याचे चित्र आहे. व्यापारी बांधवांना एकसंघ ठेवताना आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी कार्यरत रहावे, असे सांगितले. नितीन तायशेट्ये यांनी व्यापारी बांधवांनी बदलत्या व्यापाराबद्दल आपली दृष्टी ठेवून मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. येणारी आव्हाने ही व्यापारी वर्गाला स्विकारणे महत्वाचे आहे, असे सांगितले.

नुतन अध्यक्ष उमेश नेरूरकर यांनी मालवण व्यापारी संघामध्ये काम करताना नेहमीच एक वेगळी उर्जा मिळत असते. आज २५ वर्षे काम करत असतानाही नेहमीच सर्वांचे सहकार्य मिळाले आहे. यावर्षीचा व्यापारी मेळावा उत्साहात करताना व्यापारी बांधवांच्या विकासासाठी नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी आपला प्रयत्न राहिल असे सांगितले.

You cannot copy content of this page