प्राथमिक आरोग्य केंद्र नको बालवाडी सुरु करा…

लाखे डोंबारी समाज्याची मागणी; न.पा. प्रशासनाचे वेधले लक्ष

⚡सावंतवाडी ता.२८-: शहरातील लाखे वस्ती मधील सुरू असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र बंद करून त्या ठिकाणी बालवाडी सुरू करण्यास अन्यथा मिळावी अशी मागणी लाखे डोंबारी समाजाच्या वतीने पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.समाजाच्या वतीने आपल्या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच मुख्याधिकारी यांच्याकडे सादर केले आहे.

त्यात त्यांनी असे म्हटले की,लाकेवस्तीमध्ये गेली अनेक वर्ष नगरपालिकेच्या माध्यमातून बालवाडी सुरू होती कोरोना काळामध्ये सुरक्षिततेच्या हेतूने सदर बालवाडी बंद करण्यात आली मात्र अद्याप पर्यंत बंद केलेली बालवाडी पुन्हा सुरू केली गेली नाही असे असताना बालवाडी ज्या ठिकाणी भरवली जात होती त्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये अचानक पणे कोणतीही पूर्वकल्पना समाजाला न देता प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू करण्यात आले आहे मुळात या कामाला लाखे डोंबारी समाजाचा विरोध आहे.

मुळात सावंतवाडी लाखे वस्ती समाज हा दुर्बल परिस्थितीत या ठिकाणी वास्तव्य करत आहे मूलमजुरी करून समाजाचे सदस्य आपले कुटुंब चालवत आहेत त्यामुळे मुलांना खाजगी शाळेत पाठवून शिक्षणाचा खर्च करू शकत नाहीत त्यामुळे या समाजासाठी घरकुल योजनेतून उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये बालवाडी मंजूर आहे त्या इमारतीच्या जागेचा उपयोग हा मुलांच्या शैक्षणिक विकासासाठीच व्हावा इतर कोणत्या उद्देशासाठी होऊ नये त्यामुळे सदर ठिकाणी सुरू असलेल्या आरोग्य केंद्रास आमचा विरोध आहे असे निवेदनात म्हटले आहे. दुसरीकडे आरोग्य केंद्राचा विचार करता सावंतवाडी शहरात नगरपालिकेचे दवाखाना तसेच उपजिल्हा रुग्णालय जवळच आहे त्यामुळे त्या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीत उपयोग होऊ शकतो मात्र बालवाडी बंद झाल्यास खाजगी शाळेत शैक्षणिक खर्च उचलणे शक्य नसल्याने या ठिकाणीच बालवाडी पुन्हा सुरू व्हावी असे समाजाचे म्हणणे आहे. दरम्यान मुख्याधिकारी यांनी संबंधित समाजाच्या युवकांना मार्गदर्शन करताना सदर ठिकाणी सुरू असलेले प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम हे नगरपालिकेच्या कौन्सिल मध्ये ठराव घेऊन दूर करण्यात आले आहे त्यामुळे ते काम बंद करता येणार नाही परंतु आपल्याला बालवाडी पुन्हा सुरू करायची झाल्यास जिल्ह्याच्या महिला व बालकल्याण विभागा अंतर्गत प्रयत्न करा असे सूचित केले.

दिलेल्या निवेदनावर छाया लाखे, सीमा लाखे,अलका लाखे महेश लाखे, संदीप लाखे, राजू लाखे, राकेश लाखे, प्रतीक्षा लाखे, दीपक लाखे, रेश्मा खोरागडे, विकास खोरागडे, सुवर्णा पाटील, मनीषा पाटील ,शुभांगी पाटील ,अनिकेत लाखे, प्राजक्ता खोरागडे, मंगेश बेळगावकर आदीच्या सह्या आहेत.

You cannot copy content of this page